छत्रपती शिवरायांची गाथा

काही दिवसांपासून मनात अनेक विचार येत होते, बाहेरचं वातावरण जसं होत चाललय, कोणतेही क्षेत्र बघितले तर सगळीकडे नुसती गडबड, घोटाळे, भ्रष्ट व्यवस्था आणि अकर्मण्यता पसरली आहे, मला फक्त नकारात्मक बाजू बघायची नाहीये पण काय करू सध्या चांगल्या गोष्टी कमी आणि वाईट जास्ती नजरेत येऊन राहिल्या आहे.

जे काही चांगलं घडतं त्याचा अभिमान वाटतो तरी वारंवार मनात येतं की "महाराज आज तुम्ही हवे होते" मन फार सुन्न झालं आहे....विकट स्थिती उभी राहिली आहे, कोणी दंगे करतयं, कोणी दगडफेक, कोणी सैन्याला मारहाण करतयं, कोणी अफवा पसरवतय, कोण कोणाचा शत्रू आहे कळतचं नाही, राष्ट्र प्रेमाची परिभाषा काय आहे कळतच नाही, काय सिद्ध करायचं आहे? सगळं कोणत्या दिशेला चाललयं?

जो खरं बोलण्याचा प्रयत्न करतो त्याला सगळे मिळून खोटं सिद्ध करतात आणि जो सत्याच्या मार्गावर आहे त्याचा मार्ग नेहमी साठी बदलून टाकतात, भ्रष्टाचार आणि खोटं वागणं ही जीवन जगण्याची पद्धत झाली आहे, पैसा, मोठ्या गाड्या, विदेशात शिक्षण आणि पुढे तिकडेच भरपूर पगाराची नोकरी हेच आजच्या युवा पिढीचं स्वप्न आहे, भारतात काही भविष्य नाही दिले आहे?

अनेकांनी आपलं सर्वस्व पणाला लावून देशाची रक्षा केली आहे... विश्वास बसत नाही....ते महापुरुष जर आज जिवंत असते तर आजचं असं वातावरण पाहून किती दुःखी झाले असते? ज्या देशासाठी त्यांनी आपला जीव- दिला, माता मानून पूजा केली, त्या देशातून आज सत्य, धर्म आणि निष्ठा हे तत्व जणू हरवून गेले आहे.

कोण आहोत आपण? कोणत्या स्थितीत आहोत आज?? इथंवर कशे पोचलो? कल्पना करू शकतं का कोणी? एखाद्या ला वेडेवाकडं बोलणं, त्याचा कामावर टीका करणं, जनप्रतिनिधी असो किंवा मंत्री, सरळ जे तोडांत येईल ते बरळायचं, शत्रुत्व, वैर, मत्सर, जात-पात, वर्ण, उपजीविका, राहाणी अरे कित्ती आणि काय-काय मुद्दे आहे भांडायला, पण इतकं सगळं बोलायचं, वाटेल ते करायचं, हवं तसं वागायचं, कुठेही राहायचं, काहीही करायचं, इतकं सगळं कसं शक्य झालंय?

हा माज करायला आपण इथे आहोत, ते कसे? कोणामुळे हे मोकळं वातावरण आपल्याला लाभलं आहे? कोणामुळे आपल्याला असं स्वछंद आणि सुरक्षित वातावरण मिळालं आहे? ज्या धर्मासाठी आपण आज उगाच भांडतोय, पालन तर नाहीच करत पण धर्माबद्दल सादी माहिती पण नसते, इंटरनेट च्या आधारावर पुस्तक वाचण्याचा आव आणायचा पण खरोखर एक पानही वाचायचं नाही, आलेले मेसेज आणि विडियो पाहून त्यालाच सत्य मानून धारणा बनवायची आणि स्वताला ज्ञानी समजायचंच... हेच सुरू आहे ना? थोडं कटू असलं तरी हेच सत्य आहे, सध्या परिस्थिति बघता एक विचार मनात वारंवार येतोय.